“नालायक हो-निकम्मे हो…” पहलगाम हल्ल्यावर शाहिद आफ्रिदी ने ओकली गरळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ एप्रिल ।। 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांनी जीव गांवला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार आहे असे बोललेले जात आहे. दरम्यान, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी बरळला आहे. त्याच्या वादग्रस्त विधानाने आगीत तेल ओतले आहे. शाहिद आफ्रिदीने भारत आणि भारतीय सैन्याविरुद्ध अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी शाहिद आफ्रिदीने भारतीय लष्कराला जबाबदार धरले आहे. शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याला ‘निरुपयोगी’ असे म्हटले आहे.

शाहिद आफ्रिदीने ओलांडल्या सर्व मर्यादा
शाहीद आफ्रिदीने समा टीव्हीवर मुलखात देताना सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने भारतीय सैन्याविरुद्ध विष ओकले आहे. तो म्हणाला की, “जर तिथे (जम्मू आणि काश्मीर) फटाके फुटले तरी ते पाकिस्तानने केले आहे असे म्हणतात. काश्मीरमध्ये तुमचे 8,००,००० सैनिक आहेत आणि तरीही हे घडले. याचा अर्थ तुम्ही निरुपयोगी आणि अक्षम (“नालायक हो-निकम्मे हो) आहात, कारण तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही.”

भारतीय माध्यमांवर केली टीका
पुढे शाहिद आफ्रिदीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कव्हरेजबद्दल भारतीय माध्यमांवरही टीका केली आहे. यावेळी तो म्हणाला, “हल्ल्याच्या एका तासाच्या आत त्यांचे मीडिया बॉलिवूडमध्ये बदलले. सगळं बॉलिवूड बनवू नका. मला धक्काच बसला, खरं तर ते ज्या पद्धतीने बोलत होता ते मला खूप आवडलं. मी म्हणत होतो की त्यांची विचारसरणी पहा, ते स्वतःला सुशिक्षित लोक म्हणतात.”

शाहिद आफ्रिदीने बलुचिस्तानमधील अशांततेसाठी भारताला जबाबदार धरले आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला, ” आपल्या देशात काय चाललंय? बलुचिस्तानमध्ये काय चाललंय? यामागे कोण आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही कधीही कोणतेही आरोप केले नाहीत. आम्ही भारताला आणि जगाला पुरावे दिले.”

निदान पुरावे घेऊन या…
‘पाकिस्तानचा राजदूत म्हणून मी म्हणेन की मी क्रिकेटमुळेच क्रीडा राजनैतिकतेवर विश्वास ठेवतो. याला कोणताही राजकीय दृष्टिकोन नसावा. आपण शेजारी देश आहोत, आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. काही घडलं नाही की तुम्ही थेट पाकिस्तानचे नाव घेतले. निदान पुरावे घेऊन या, जगाला सांगा. माझा असा विश्वास आहे की आपला धर्म कोणताही असो, तो दहशतवादाचे समर्थन करत नाही. एक माणूस म्हणून, एक निष्पाप माणूस म्हणून, तिथे जे घडले ते खूप खेदजनक आहे. अशा गोष्टी घडू नयेत. शेजारी देश आहेत. मला वाटतं की आपल्यातील संबंध चांगले असायला हवेत. लढाईचा कोणताही परिणाम होत नाही.

आफ्रिदीने द्वेषाची आग पेटवली
शाहिद आफ्रिदीने एका माजी भारतीय क्रिकेटपटूने नाव न घेता पाकिस्तानवर आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘भारतासाठी इतके क्रिकेट खेळलेले दोन क्रिकेटपटू. तो माजी राजदूत आहे, माजी अव्वल क्रिकेटपटू आहे, तो थेट पाकिस्तानला दोष देतो. भाऊ पाकिस्तान का? मित्रा, मला फक्त काही पुरावा दाखव.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *