महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मे ।। पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पिंपरी चिंचवड भागात मंगळवारी (दि.20) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 101 मि.मी. पाऊस एकाच दिवसात झाल्याने तेथे अतिवृष्टीची नोंद झाली. तर पुणे शहरात 40 तर जिल्ह्यातही सर्वंच भागात दमदार पावसाने हजेरी लावली.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याला मंगळवारी पावसाने अक्षरशः झोपडून काढले. सर्वाधिक पाऊस पिंपरी चिंचवड भागात 101 मि.मी. तर जिल्ह्यातील लोणावळा, हवेली, गिरीवन, माळीण पुरंदर भागातही जोरदार पाऊस झाला. बुधवारीही जिल्ह्यात, विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम होता. (Latest Pune News)
बुधवारी दिवसभरात पुणे शहरातील काही भागांत रिमझिम पाऊस झाला. फक्त एनडीए भागात 20 मि.मी. इतका जास्त पाऊस झाला होता. बुधवारी त्याने विश्रांती घेतली, असे वाटत असताना रात्री 8.45 च्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटांसह सर्वच भागांत पावसाला सुरुवात झाली. पाषाण, बाणेर भागात पावसाचा जोर जास्त होता.
मंगळवारी जिल्ह्यात झालेला पाऊस:
चिंचवड 101 मि.मी
तळेगाव ढमढेरे 85.5 मि.मी
हडपसर 76 मि.मी
डुडुळगाव 70.5 मि.मी
वडगाशेरी 67 मि.मी
एनडीए 65.5 मि.मी
लोणावळा 56.5 मि.मी
पाषाण 54 मि.मी
हवेली 49 मि.मी
तळेगाव 44 मि.मी
गिरीवन 42 मि.मी
शिवाजीनगर 40.5 मि.मी
लवळे 35.5 मि.मी
राजगुरुनगर 29 मि.मी
माळीण 28 मि.मी
कोरेगाव पार्क 28 मि.मी
नारायणगाव 28 मि.मी
पुरंदर 17.5 मि.मी
निमगिरी 12.5 मि.मी
बालेवाडी 6 मि.मी
भोर 6 मि.मी
बारमती 5 मि.मी
मान्सून देशाच्या सीमेवर येऊन ठेपला
मान्सून श्रीलंका, मालदीव ओलांडून बुधवारी (दि. 21) देशाच्या सीमेवर आला. आता तो कधीही केरळ आणि कर्नाटकात येईल, अशी स्थिती आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 25 मेपर्यंत केरळात येईल. पुढील 6 ते 7 दिवसांत पश्चिम किनार्यावर (गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.