महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | सोने आणि चांदीच्या दरानं आता नवा टप्पा गाठला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर सव्वा लाखांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. दिवाळी या सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दिवाळीला आपण सोनं हमखास खरेदी करतो. मात्र, वाढत्या सोन्याच्या दरामुळे सोनं खरेदी करावं की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली आहे. वाढत्या सोन्याच्या दरामुळे ऐन सणावाराला सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार एवढं मात्र नक्की.
आज ९ ऑक्टोबर २०२५. गुरूवारी सोन्याच्या दरानं नवा टप्पा गाठला आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २२० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२४,१५० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,२०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,४१,५०० रूपये मोजावे लागतील.
२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१३,८०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,००० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,३८,००० रूपये मोजावे लागतील.
२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १६० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९३,११० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १,६०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,३१,१०० रूपये मोजावे लागतील.
चांदीच्या दरातही वाढ
सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात १ ग्रॅममागे १ रूपयांची वाढ झाली आहे. १ ग्रॅम खरेदीसाठी १६१ रूपये मोजावे लागतील. तर, एक किलो चांदी खरेदीसाठी १,६१,००० रूपये मोजावे लागतील.