✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ नोव्हेंबर २०२५ | राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार!मागील काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत.न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने नोव्हेंबरमध्येच बिगूल वाजण्याची चिन्हे आहेत.
🗓️ ५ किंवा ६ नोव्हेंबरला मोठी घोषणा शक्य सूत्रांच्या माहितीनुसार,
➡️ निवडणुकीचं वेळापत्रक ५ किंवा ६ नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे.
➡️ घोषणा झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल.
जरी निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी राजकीय पक्षांनी प्रचारयंत्रणा सज्ज केली आहे. अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांची अंतर्गत बैठका सुरू झाल्या आहेत.
🏛️ पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणुकीचा राऊंड
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका मागील पाच वर्षांपासून रखडल्या होत्या. न्यायालयीन आदेशानंतर आता या निवडणुकांची प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे.
⚙️ तीन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुका तीन टप्प्यांत घेण्यात येऊ शकतात —
1️⃣ पहिला टप्पा : नगरपालिका निवडणुका
2️⃣ दुसरा टप्पा : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या
3️⃣ तिसरा टप्पा : महानगरपालिका निवडणुका
राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी यासाठी प्रचार रणनीती तयार करणे, प्रचार समित्या स्थापन करणे आणि उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करणे सुरू केले आहे.आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकीय समीकरणं नव्याने बदलण्याची चिन्हं दिसत आहेत.
