RBI Repo Rate : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! होम लोन होणार स्वस्त — RBI ५ डिसेंबरला मोठा निर्णय घेणार

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ नोव्हेंबर २०२५ | होम लोनच्या हप्त्यांनी त्रस्त असणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर—रिझर्व्ह बँक लवकरच रेपो रेट कमी करत सर्वसामान्यांना गारवा देऊ शकते.

५ डिसेंबरच्या पतधोरण बैठकीत २५ बेसिस पॉइंट्स कपातीची शक्यता प्रचंड.यामुळे रेपो रेट थेट ५.२५% वर येऊ शकतो.

🔍 RBI गव्हर्नरचा संकेत — “कपातीला अजूनही वाव आहे”
RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनीच स्पष्ट सांगितलं—
✔ आर्थिक निर्देशांक सुधारलेत
✔ महागाई नियंत्रणात
✔ वापरातील कमजोरीला चालना देण्यासाठी रेपो रेट कमी करणे आवश्यक

वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत आधीच १०० बेसिस पॉइंट्सची कपात,मागील वेळी दर स्थिर… आणि आता पुन्हा कपातीचा मार्ग मोकळा.

🏠 होम लोन, कार लोन, पर्सनल लोन — सगळे स्वस्त!
रेपो रेट कमी = व्याजदर कमी
व्याजदर कमी = EMI कमी

👉 होम लोन
👉 कार लोन
👉 पर्सनल लोन
तीन्हीही कर्जे थेट स्वस्त होणार.

सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण हलका होईल.

📉 चलनवाढ घटली, किंमती कमी — RBIला ‘स्पेस’ मिळाली
सरकारने अन्नधान्य व आवश्यक वस्तूंवरील करकपात केली.
त्याचा थेट परिणाम — ऑक्टोबरमध्ये चलनवाढ फक्त ०.२५%
रुपया जरी घसरत असला तरी बाजारातील कमकुवत खपाला साथ देण्यासाठी RBIला आता मार्ग मोकळा.

🎯 ५ डिसेंबर निर्णायक — घर घेणाऱ्यांच्या आशा RBIकडे!
संधीचा मार्ग उघडतोय… EMI कमी करण्याचा प्रश्न RBIच्या निर्णयावर.

५ डिसेंबरची बैठक —
घर घेणाऱ्यांसाठी नव्या वर्षाच्या आधीचा सर्वात मोठा दिलासा ठरू शकते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *