![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १ मार्च २०२६ |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
घरातील कुरबुरी समजून घ्या. जिभेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलांच्यात रमून जाल. नवीन लोक संपर्कात येतील. अती विचार करू नये.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
जोडीदाराचे विचार जाणून घ्याल. उघडपणे बोलणे टाळाल. कमिशन मधून लाभ मिळेल. अधिकार्यांचा सल्ला घ्यावा लागेल. भागीदारीचे संबंध सुधारतील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
फसवणुकीपासून सावध राहा. जामीन राहताना पूर्ण विचार करावा. नातेवाईकांच्या मदत मिळेल. चोरांपासून सावध राहावे. कामाचा आनंद मिळेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल. पोटाची तक्रार जाणवू शकते.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे मनापासून कराल. जोडीदाराशी विचारविनियम कराल. क्षुल्लक कारणांवरून गैरसमज करून घेऊ नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. आर्थिक गरजेचं हिशोब मांडावा. मोठ्या लोकांशी संपर्क होईल. जवळचा प्रवास घडेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कौटुंबिक शांतता जपावी. आपले प्रभुत्व गाजवाल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामातून समाधान मिळवाल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
तुमची उत्तम छाप पडेल. गप्पा गोष्टींची मैफल जमवाल. मित्रा मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यसनांपासून दूर राहावे.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आततायीपणा करू नका. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. अनाठायी खर्च करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
आपल्या इच्छेला अधिक महत्व द्यावे. धार्मिक यात्रेसाठी नाव नोंदवाल. सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. अपवादाकडे दुर्लक्ष करा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
चौकसपणे विचार कराल. मित्रांशी वादावादी संभवते. कामे चिकाटीने पूर्ण कराल. वेळेचे महत्व समजून वागाल. तुमची समाजप्रियता वाढेल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
कामाचा व्याप लक्षात घ्यावा. गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल. लबाड लोकांपासून दूर राहावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. हाताखालील कामाला उत्तम नोकर मिळतील.