Horoscope Today दि. ३ मार्च २०२६ ; आज कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील ……….. ..; पहा बारा राशींचं भविष्य — —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मार्च २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
धार्मिक कामात हातभार लावाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. नावलौकिकास पात्र व्हाल. दानाचे महत्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
प्रवासात सतर्क राहावे. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. मनात उगाचच भीती दाटून येईल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. उगाचच विरोध करणे टाळावे. वैवाहिक सुख-शांती जपावी. मोठ्या लोकात वावराल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
पोटाचे त्रास संभवतात. फार तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
स्वत:चा हेका गाजवाल. मैदानी खेळ खेळाल. आपले ज्ञान उपयोगात आणावे. चर्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कौटुंबिक समस्या शांततेने सोडवावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल. वाहन सावधगिरीने चालवावे.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मानसिक संवेदनशीलता दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे. मनात काहीशी भीती लागून राहील. नवीन विषय जाणून घ्यावेत. चलाखीने वागणे ठेवाल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
घरगुती प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शा‍ब्दिक चकमक टाळावी.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
मानसिक चलबिचलता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे. परिस्थितीला नावे ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
शांत व संयमी विचार करावा. लोकनिंदेला बळी पडू नका. जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
मित्रांशी मतभेद संभवतात. कसलाही वाद वाढू देवू नका. बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल. वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
कामाचा व्याप लक्षात घ्यावा. स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा. वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा. कागदपत्रे तपासून घ्यावीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *