![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ एप्रिल २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
घरगुती गोष्टींवर लक्ष घाला. धार्मिक कामात मदत कराल. मानसिक तान वाढू शकतो. त्यागाचे महत्त्व पटवून द्याल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
काही कामे सहजगत्या पार पडतील. कामातील बदल नीट लक्षात घ्यावेत. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. लोक तुमच्यावर खुश होतील. अधिकार्यांचा सल्ला विचारात घ्या.
मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
जोडीदाराच्या सहवासाचे सौख्य वाढेल. वेळेवर कामे पूर्ण करावीत. साथीच्या रोगांपासून काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणामुळे निराश होऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. काही कामात अनपेक्षीतता येईल. भागीदाराशी मतभेद संभवतात. कचेरीच्या कामात वेळ जाईल. वरिष्ठांना खुश करावे लागेल.
सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. कष्टाने कामे पार पडतील. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. चुगल्या करणार्या व्यक्तींपासून त्रास संभवतो. उष्णतेचे त्रास संभवतात.
कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. वेळ चुकवून चालणार नाही. प्रेमप्रकरणात कटकट वाढेल. उधळेपणा करू नका.
तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्या. घरासंबंधीचे प्रश्न सोडवावेत. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
तुमच्यातील हिम्मत वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा व्याप वाढेल. हाती आलेली संधी सोडू नका. नातेवाईकांच्या कुरबुरी वाढू शकतात.
धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
आवश्यकता असेल तरच खरेदी करा. मानसिक व्यग्रता जाणवेल. औद्योगिक वाढीकडे लक्ष द्यावे. कोर्ट-कचेरीची कामे निघतील. मागचा पुढचा नीट विचार करावा.
मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
कामातील अडचणी दूर करव्यात डोकेदुखीचा त्रास जाणवेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. स्वभावात हट्टीपणा येईल. उत्साहाने कामे करावीत.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी प्रकरणे सामोरी येऊ शकतात. आर्थिक बाबीची चिंता सतावेल. वादविवादात लक्ष घालू नका. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.
मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
मौल्यवान वस्तु खरेदी कराल. कष्टाला पर्याय नाही. बौद्धिक डावपेच खेळाल. चातुर्याने कामे मिळवाल. कामाचा थकवा जाणवेल.