क्रिकेट मधून थेट सिनेमा जगतात माहीची एंट्री, साक्षीनं सांगितला प्लॅन

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ ऑक्टोबर – मुंबई – क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खास शैलीनं आणि हेलकॉप्टर शॉटनं लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेल्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र निवृत्तीनंतरही धोनी आयपीएलमध्ये खेळून लोकांचे मनोरंजन करत आहे. आता धोनी खरच मनोरंजन जगतात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटनंतर आता धोनी मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी सज्ज आहे. धोनी अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. धोनीची पत्नी साक्षीनं याबाबत माहिती दिली.

धोनी आता पौराणिक विज्ञान (mythological sci-fi web-series) वेब सीरिजवर काम करणार आहे. या सीरिजचा धोनी निर्माता असणार आहे. साक्षीनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून यासंबंधी माहिती जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *