![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ सप्टेंबर २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
विनाकारण आक्रमकता दाखवू नका. नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. मेहनत फळाला येईल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
बोलण्यात गोडवा ठेवाल. घरगुती जबाबदारी वाढू शकते. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा. व्यावसायिक निर्णय फलद्रुप होताना दिसतील.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. हातातील अधिकार ठामपणे बजावा. भाग्याची चांगली साथ मिळेल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
दिवसाची सुरुवात छान होईल. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील. आळस दूर सारावा.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
आपले स्वत्व राखून वागाल. मुलांबरोबर चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. वेळेचा सदुपयोग करा.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे संकेत.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
दिवसाची सुरुवात उत्साहात करा. छोटे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरातील ज्येष्ठांची संवादात्मक चर्चा करावी.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवा. आर्थिक व्यवहार सर्व बाबी तपासून करावेत. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
जुन्या विचारांना थारा देऊ नका. बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करा.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
कामातून समाधान लाभेल. तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकार्यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. जुने वाद मिटण्याची शक्यता.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
उतावीळपणे वागू नका. हातातील कामे यशस्वी होतील. रागावर नियंत्रण ठेवावे. संशोधन पुढे नेण्यास उत्तम काळ.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा. लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. जुनी गुंतवणूक कामी येईल. जोडीदाराचे व्यावहारिक चातुर्य दिसेल.
डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक किंवा सत्य असल्याचा दावा केला जात नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.