निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हा; कोणाचंही प्यादं बनून राहू नका, , बदल घडवा: राज ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – मुंबई – जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. International Women’s Day च्या शुभेच्छा देतानाच या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी महिलांसाठी खास संदेश लिहला आहे. राजकारणात आणि समाजकारणात असणाऱ्या महिलांनी कोणाचंही प्यादं बनून राहायची गरज नाही. तुम्ही निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन बदल घडवला पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. (MNS chief Raj Thackeray wrote a letter on International Women’s Day 2021)

राज ठाकरे पत्रात नेमकं काय म्हटलंय?
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील” त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.

मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही.

राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता.

बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *