World Test Championship : हॉटेलमुळे बदलणार फायनलचं स्टेडियम!

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – मुंबई – इंग्लंडविरुद्धच्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा (India vs England) 3-1 ने विजय झाला. याचसोबत टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship) प्रवेश मिळवला. फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी (India vs New Zealand) होणार आहे. 18-22 जूनमध्ये ही फायनल खेळवली जाणार आहे. लॉर्ड्सवर हा सामना होईल, असं सांगितलं जात होतं, पण आता फायनलसाठीचं ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल लॉर्ड्स ऐवजी साऊथम्पटनच्या रोज बाऊलमध्ये होऊ शकते, कारण स्टेडियमच्याच परिसरामध्ये हिल्टन हॉटेल आहे, त्यामुळे खेळाडूंना हॉटेलमधून थेट मैदानात येता येईल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मागच्या वर्षी कोरोनाच्या संकटात वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध साऊथम्पटन आणि मॅन्चेस्टरमध्ये सीरिज खेळवली होती.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार लॉर्ड्सवरच्या फायनलबाबत विचार केला जात असल्याचं आयसीसीच्या सूत्रांनी सांगितलं. ‘ठिकाणाची लवकरच घोषणा केली जाईल. आयसीसीचं प्लानिंग लॉर्ड्स नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून आयसीसी सल्ला घेईल. इंग्लंडने मागच्या वर्षी जसा बायो-बबल बनवला होता, तसा यावेळीही बनवला जाऊ शकतो,’ असं आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *