Gold Rate Today : सोनं आणि चांदी भाव घसरला ; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । मुंबई ।डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबुती आणि आंतरराष्ट्रीय किमतीतील घसरणीमुळे शनिवारी सराफा बाजारात सोन्याचे भाव (Gold Rate Today) खाली आलेत. सोन्याच्या दरात दोन दिवसात प्रति १० ग्रॅम १९० रुपयांची घट झालीय. त्याचबरोबर औद्योगिक मागणीतील कमकुवतपणामुळे चांदीचे दरही घसरले. एक किलो चांदीची किंमत ७०० रुपयांनी घसरली.

शनिवारी पण सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली. सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४,५३० वर आली. ऑगस्ट 2020 मधील सोन्याच्या किंमती ५६,२०० च्या सर्वोच्च पातळीवर गेली होती. ती जवळजवळ २० टक्के म्हणजेच १३ हजारांनी घसरली आहे. 2021 मध्ये सोन्याचे उच्च स्तरावरून स्वस्त दरात ५,००० रुपयापर्यंत घसरले आहे. अक्षय तृतीया १४ मे रोजी आहे. त्याआधी सोन्याच्या किमती खाली आल्यामुळे खरेदीदारांसाठी मोठी संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *