‘या’ जबरदस्त फिचर्समुळे टेलिग्रामच्या युझर्स व्हॉट्सअ‍ॅप पेक्षा वाढू शकतात

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.३० एप्रिल । आता इंस्टंट मेसेजिंग अॅप टेलिग्रामने व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना आकर्षित करण्याकरिता पूर्णपणे जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. टेलीग्रामने नुकतेच बरेच फीचर्स लॉन्च केले असून यात आता आणखी एक जबरदस्त फिचर जोडले जाणार आहे. बऱ्याच युझर्सने पॉलिसीचा वाद झाल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपकडे पाठ फिरविली आणि टेलिग्रामची वाट धरली. म्हणूनच टेलिग्राममध्ये हे खास फीचर जोडल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा युजरबेस कमी होईल, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.मे मध्ये युझर्सकरिता ग्रुप व्हिडिओ कॉल एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप टेलीग्राम सुरू करणार आहे, त्यात वेब-आधारित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला समर्थन देखील आहे. नवीन साधनाला अपेक्षेपेक्षा जास्त वैशिष्ट्ये मिळतील.

याबाबतची माहिती टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव यांनी आपल्या अधिकृत टेलिग्रामवर पोस्टद्वारे दिली आहे. ज्यात त्यांनी लिहिले कि, मेमध्ये आमच्या व्हॉईस चॅटमध्ये एक व्हिडिओ डायमेन्शन आम्ही जोडू . ज्यामुळे टेलिग्राम ग्रुप व्हिडीओ कॉलसाठी एक शक्तिशाली व्यासपीठ बनेल. ते पुढे म्हणाले, स्क्रीन शेयरिंग, एन्क्रिप्शन, नॉइज-कँसलिंग, डेस्कटॉप व टॅबलेट सपोर्ट – एक मॉडर्न Video Conferencing Tool असेल. आपण आधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साधनाकडून अपेक्षा करू शकता. मूळात २०२० मध्ये त्याच्या मेसेजिंग सेवेमध्ये कंपनीने व्हिडिओ कॉल फीचर जोडण्याची योजना आखली होती.

टेकक्रंचने आपल्या अहवालात म्हटले आहे की टेलिग्राम अनेकदा नवीन वैशिष्ट्ये जोडण्यासाठी प्रतिस्पर्धींवर टीका करतो, परंतु व्हिडिओ कॉल्सच्या बाबतीत मागे राहतो, कंपनीने ऑगस्ट २०२० मध्ये प्लॅटफॉर्मवर वन-ऑन-वन व्हिडिओ कॉल जोडल्यामुळे हे सर्व शक्य होणार आहे. टेलिग्रामने एप्रिल २०२० च्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की ग्लोबल लॉकडाउनने 40 कोटी वापरकर्त्यांचा आकडा ओलांडल्यावर विश्वसनीय व्हिडीओ कॉलिंग फिचरच्या आवश्यकटेकडे लक्ष वेधले होते.

ग्रुप व्हिडिओ कॉलिंगच्या सुरक्षेवर देखील टेलिग्रामने जोर दिला आणि कदाचित म्हणूनच कंपनी हे फिचर आणण्यात उशीर करीत आहे. टेलिग्रामने सांगितले की ते एप्रिल २०२० मध्ये ४० कोटी सक्रिय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले, २०१८ मध्ये टेलिग्रामवर २०० दशलक्ष वापरकर्ते होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *