महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० मे । टपाल विभागात (India Post) नोकरीच्या संधीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय टपाल खात्याने ग्रामीण डाक सेवक (India Post GDS Recruitment) भरती 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरी (Govt Jobs for 10th Pass) करण्यास इच्छुक आहात तर या भरतीसाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्जांसाठी मुदत २६ मे होती, ती आता वाढवून१० जून २०२१ करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे या भरती साठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे मेटिर लिस्ट तयार होईल.
महाराष्ट्र पोस्टल सर्कल येथे ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टस्टर, डाक सेवक) पदांच्या एकूण 2428 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 १० जून 2021 (मुदतवाढ) आहे. (हि मुदतवाढ रजिस्ट्रेशन झालेल्या उमेदवारांसाठी आहे ज्यांनी फीस भरती पण अर्ज सबमिट कारू शकले नाही.)
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra Postal Circle Recruitment 2021 Apply Online
विभागाचे नाव महाराष्ट्र पोस्टल सर्कल (Maharashtra Postal Circle)
पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)
पद संख्या 2428 Vacancies
नोकरी ठिकाण महाराष्ट्र (Maharashtra)
वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे (18 to 40 Years)
किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयोमर्यादा. वयाची गणना २७ एप्रिल २०२१ पासून होईल.
अर्ज पद्धती ऑनलाईन (Online)
फीस
रु. 100/- (Rs. 100/-)
अधिकृत वेबसाईट appost.in
निवड प्रक्रिया
– उमेदवारांनी केलेल्या ऑनलाइन अर्जांच्या आधारे मेरिट यादी तयार करून निवड केली जाईल.
– उच्च शिक्षण योग्यता असेल तरी त्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारे प्राधान्य मिळणार नाही. अंतिम निवड ही दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच होईल.
– जर उमेदवाराना पाच पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केला आहे आणि मेरिटच्या आधारे त्याची एकापेक्षा अधिक पदांवर निवड झाली तर त्याची एकाच पदावर निवड होईल.
मासिक वेतन
-बीपीएम पदासाठी १२ हजार ते १४,५०० रुपये
– जीडीएस/एबीपीएमसाठी १० हजार ते १२ हजार रुपये