मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग 2020 चा सलामीचा सामना

Spread the love

महाराष्ट्र २४ : इंडियन प्रीमिअर लीग 2020 ( आयपीएल 2020) चा उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. 29 मार्चला वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिका संपल्यानंतर 11 दिवसांनी आयपीएल 2020 ला सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग बाद फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर करणार असून अंतिम सामना 24 मे रोजी होणार आहे.

आयपीएलनं अजून याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु काही प्रमुख संघांनी त्यांच्या सामन्यांचे वेळापत्रक सोशल मीडियावर पोस्ट केले. 17 मे रोजी अखेरचा साखळी सामना होणार आहे आणि तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात बंगळुरु येथे होईल. विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये शनिवारी डबल हेडर सामने होणार नाहीत. त्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढला आहे. गतवर्षी ही स्पर्धा 44 दिवसांत झाली होती, परंतु यंदा 50 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे काही घरचे सामने यंदा गुवाहाटी येथे होणार आहेत. त्यानुसार 5 एप्रिल ( वि. दिल्ली कॅपिटल्स) आणि 9 एप्रिल ( वि. कोलकाता नाइट रायडर्स) हे सामने गुवाहाटी येथे होतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *