पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी ओबीसी कॉंग्रेस पक्षाची ओबीसी आरक्षण मंथन बैठक संपन्न

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै ।आज पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी ओबीसी कॉंग्रेस पक्षाची ओबीसी आरक्षण मंथन बैठक संपन्न झाली. ही बैठक माननीय संजोग वाघेरे पाटील पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बोलताना मा. ईश्वर जी बाळबुधे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस म्हणाले की ओबीसींना न्याय देण्याची भूमिका नेहमी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ओबीसींनी पिंपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी झोकुन काम करण्याची पराकाष्टा केली पाहिजे. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की ओबीसी राजकीय आरक्षणा बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओबीसी समाजाच्या मागे खंबीर पनाने उभा राहील.

राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे निरीक्षक ॲड. सचिन आवटे म्हणाले येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेल हा काम करत आहे. पिंपरी चिंचवड ओबीसी शहराध्यक्ष माननीय विजय लोखंडे म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ता येण्यासाठी आम्ही संघर्ष करू. पिंपरी चिंचवड महिला राष्ट्रवादी ओबीसी शहराध्यक्ष मा. सारिका ताई पवार म्हणाल्या पिंपरी चिंचवड मध्ये महिलांचे संघटन करून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न करू. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्टीचे शहर उपाध्यक्ष. मा. पि.के.महाजन यांनी केले मा. सतीश चोरमले यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. यावेळी बैठकीसाठी मा. स्मिता वाघोले,मा. प्रदीप आहेर, मा. प्रकाश अल्लाट, मा. ज्ञानेश अल्लाट, मा. नितीन कुटे शहराध्यक्ष श्री संत सेना विकास संस्था, मा. तेजस पंडित कार्याध्यक्ष श्री संत सेना विकास संस्था पिंपरी चिंचवड, मा. संतोष गोरे सर, मा. दिनेश पवार, मा. संतोष माळी, मा. मनोज सुतार भोसरी विधानसभा अध्यक्ष ओबीसी विभाग, मा. दत्ता बनसोडे, मा. अशोक मगर, विद्याताई शिंदे, मा. कविताताई खराडे, मा. माधवीताई सोनार, मा. माधुरीताई गायकवाड, मा. बसवराज देवरमणी, राजेंद्र जाधव, बालाजी मुळे, अमोल देवकर, गजानन दळवी, राजू माने, रमेश सायकर, दादासाहेब पवार, मा. नरेंद्र वाळुंजकर पिंपरी चिंचवड नाभिक समाज नेते, नागेश भोपुलकर, मंगेश चातुर, पार्थ मोरे, प्रल्हाद सुरासे, भारत सनईकर, सतीश राऊत, प्रसाद तुपे, अमोल देवकर, उमेश दादा आवटे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस सरचिटणीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *