मुंबई; शनिवार–रविवारचा वीकेण्ड लॉकडाऊनही हटला, दुकाने रात्री 10 पर्यंत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । शनिवार-रविवारचा वीकेण्ड लॉकडाऊन हटवत मुंबई महापालिकेने उद्यापासून शहर-उपनगरातील सर्व दुकाने सर्व दिवस-रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटस्ना मात्र दुपारी 4 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने आज राज्यातील 14 जिल्हे वगळता इतर जिल्हय़ांतील सर्व दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर महापालिकेने रात्री उशिरा मुंबई शहर, उपनगरातील नवी नियमावली जारी केली.

राज्य सरकारची नवी नियमावली कधी जाहीर होणार याबाबत सर्वसामान्यांपासून ते व्यापाऱयांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता होती. राज्य सरकार निर्बंध शिथिल करणार या त्यांच्या अपेक्षेची सरकारने दखल घेतली आहे. त्यानुसार ब्रेक दी चेनची नवीन नियमावली आज सायंकाळी जाहीर करण्यात आली. निर्बंध शिथिल करण्यात आलेली ही नियमावली उद्या सकाळपासूनच लागू करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *