महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १०ऑगस्ट । अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र व तळकोकणात पूरस्थिती निर्माण झाली होती. पश्चिम महाराष्ट्र व तळकोकणात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने , महापुर आल्याने हाहाकार उडाला आहे. परिणामी येथील नागरिकांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील नागरीकांची हीच गैरसोय लक्षात घेऊन एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमांतर्गत कोकण व पश्चिम महाराष्ट्रात राजा शिवछत्रपती चॅरीटेबल ट्रस्ट निगडी कार्यकर्त्यांनी मदत नव्हे सेवाभाव जोपासला. पूरग्रस्तांना मदत करण्याचा प्रामाणिकपणे हेतू समोर ठेऊन जुने खेड ता.वाळवा जी.सांगली येथील बाधितांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. या वेळी राजा शिवछत्रपती चॅरीटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री. दिनेश देशमुख, सुशांत भिसे, जलील पठाण, निलेश उपादे, जावेद जमादार, मयूर काकडे हे उपस्थित होते.
पूरग्रस्तांना मदत केल्याबद्दल ट्रस्टचे मार्गदर्शक श्री.फत्तेसिंह कृष्णराव पाटील सर ( विशेष पोलिस महानिरीक्षक गुन्हा अन्वेषण पुणे)सरांनी अभिनंदन केले.