या कंपनीने घेतला मोठा निर्णय ; लस घेतली नसेल तर पगारातून कापले जाणार दरमहा 15000 रुपये;

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । ज्याठिकाणी वर्क फ्रॉम होम शक्य नाही आहे, त्याठिकाणी कोरोनाविषयक निर्बंध कठोर करून कंपन्यांनी संबंधित कामं सुरू केली आहेत. डेल्टा एअर लाइन्सने (Delta Air Lines) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लशीचे दोन्ही डोस घेणं अनिवार्य असणार आहे. CNBC ने दिलेल्या वृत्तानुसार व्हॅक्सिन (Covid-19 Vaccine) न घेतल्यास कर्मचाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्सवर दरमहा 15 हजार रुपये सरचार्ज आकारण्याची घोषणा केली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे.

अटलांटा बेस्ड या एअरलाइन्सचे सीईओ एड बास्टियन यांनी अशी माहिती दिली आहे की, जर त्यांनी लस घेतली नसेल तर 1 नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर $200 (साधारण 14,831 रुपये) अधिकचा चार्ज द्यावा लागेल. त्यांनी अशी माहिती दिली की अलीकडच्या आठवड्यात कोरोनामुळे रुग्णालयात भरती असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. बास्टियन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोव्हिड-19 च्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येणारा खर्च जवळपास 50 हजार डॉलर आहे.

एअरलाइनकडून बुधवारी अशीही माहिती देण्यात आली आहे की, कंपनी 12 सप्टेंबरपासून दर आठवड्याला टेस्टिंग करणार आहे. याशिवाय मास्क वापरणे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बंधनकारक असेल.

डेल्टा एअरलाइन्सच्या सीईओंनी अशी माहिती दिली की कंपनीतील 75 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जुलैच्या मध्यापर्यंत 72 टक्के लसीकरण झालं होतं, उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकर पूर्ण केले जाणार आहे.

यूनायडेट एअरलाइन्सने असे म्हटले आहे की 27 सप्टेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांनी लस घेणे आवश्यक असेल. 27 सप्टेंबरनंतर कंपनीने कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांना नोकरी देखील गमवाली लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *