Northern Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 3093 जागांसाठी भरती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । भारतीय उत्तर रेल्वे (Northern Railway Recruitment 2021) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. तब्बल 3093 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना (Northern Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षण मिळावं यासाठी ही भरती असणार आहे. अप्रेन्टिस (Railway Apprentice jobs) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या लिंकवर (northern railway recruitment 2021 online application form) अर्ज (Latest Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अप्रेन्टिस (Apprentice) – एकूण जागा 3093

पात्रता आणि अनुभव

अप्रेन्टिस (Apprentice) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://rrcnr.org/ या लिंकवर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *