Government Jobs: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ इथे विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्याची शेवटची तारीख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० नोव्हेंबर । महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (Maharashtra Information Technology Corporation Ltd) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha IT Corporation Ltd Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वित्त आणि लेखा व्यवस्थापक, लेखाधिकारी, वित्त कार्यालय, लेखापरीक्षा अधिकारी, वित्त कार्यकारी या पदांसाठी ही भरती (Maharashtra Government Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज कारण्यासाठी पत्ता/ई-मेल आयडी

मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्रा इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र सरकार एंटरप्राइज) तिसरा मजला, अपीजय हाऊस, के.सी.कोलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – 400020 / hr1.mahait@mahait.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. https://mahait.org/Awards2021.html

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahait.org/या लिंकवर क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *