Ind vs Nz: टीम इंडिया करणार क्लीन स्वीप ? असे होऊ शकतात संघात बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ नोव्हेबर । न्यूझीलंड विरुद्ध 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज संध्याकाळी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय संघ हा सामना जिंकून क्लीन स्वीप करू शकतो. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी देऊ शकतो, त्यामुळे संघात बदल होणं निश्चित मानलं जातंय.

टीम इंडियाने मालिकेत आधीच 2-0 अशी आघाडी घेतली आहे. जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या T-20 सामन्यात भारतीय संघाने किवी संघाचा 5 विकेट्स राखून तर रांचीतील दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्स राखून पराभव केला. तिसरा टी-20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून क्लीन स्वीप करू शकतो.

सलामीची जोडी ठरलेली
टीम इंडियाने अद्याप प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलेली नाहीये. मात्र रोहित शर्मा आणि केएल राहुल भारताच्या सलामीची जबाबदारी घेऊ शकतात. या दोन्ही धोकादायक फलंदाजांनी सलामी करताना संघाला अनेक सामने जिंकून दिलेत. हे फलंदाज जेव्हा फॉर्मात असतात तेव्हा ते कधीही सामन्याचे फासे फिरवू शकतात.

तीन नंबरसाठी अनेक पर्याय
भारतीय कर्णधार विराट कोहलीला टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकासाठी अनेक दावेदार रिंगणात आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर तर दुसऱ्या सामन्यात युवा व्यंकटेश अय्यर आला. सूर्यकुमारने पहिल्या सामन्यात 3 व्या क्रमांकावर खेळताना मोठी खेळी केली. त्याला या ठिकाणी फलंदाजीसाठी पाठवलं जाऊ शकतं.

या दोन खेळाडूंचा पत्ता कट?
दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार हे खूप महागडे गोलंदाज ठरले आहेत. दुसऱ्या T20 सामन्यात कुमारने चार ओव्हरमध्ये 39 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. त्याचवेळी दीपकने चार ओव्हरमध्ये 42 धावा देत केवळ एक विकेट घेतली. अशी कामगिरी पाहता या दोघांना तिसऱ्या टी-20मध्ये विश्रांती दिली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *