दिल्लीत शाळा, थिएटर, जिम बंद; लग्नसोहळ्याठी केवळ 20 जणांची उपस्थिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । कोरोनाबरोबर नवा व्हेरिएंट ओमयक्रोनचे संसर्ग रुग्णसंख्या झापाटय़ाने वाढत असल्यामुळे राजधानी दिल्लीत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दिल्ली सरकारने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, शाळा, थिएटर्स, जिम बंद करण्याचे आदेश दिले आहे. दुकाने, मॉल्स ऑड-इव्हन फॉर्म्युलानुसार एक दिवसाआड सुरू राहतील. गर्दी टाळण्यासाठी सर्व राजकीय, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. तर विवाहसोहळा केवळ 20 जणांच्या उपस्थितीत पार पाडावा लागणार आहे.

24 तासांत दिल्लीत 331 नवे कोरोना रुग्ण आढळले तर, ओमायक्रोनची रुग्णसंख्या 165वर झाली आहे. गेल्या आठवडय़ात दिल्लीत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन ‘यलो अलर्ट’ जारी करण्याचे आदेश दिले आणि नवीन कडक निर्बंध जारी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *