अगदी सुरक्षितपणे पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे होतील दुप्पट आणि टॅक्समध्येही फायदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी । जर आपण पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल आणि सुरक्षित परतावा मिळवू इच्छित असाल तर ही बातमी आपल्या फायद्याची आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील तसेच आणखी बरेच फायदे मिळतील.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम (टीडी अकाउंट) बद्दल बोलत आहोत, खास गोष्ट म्हणजे या स्कीममध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल. या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. चला तर जाणून घेवूयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती…

या योजनेत आपण १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकतो. सध्या १ वर्षाच्या मुदतीच्या एफडी (FD) खात्यांवर ५.५ टक्के व्याज दर उपलब्ध आहे. तर २ वर्षांच्या एफडी आणि ३ वर्षांच्या एफडीवर ५.५ टक्के व्याजदर उपलब्ध आहे.

याशिवाय पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर ६.७ टक्के व्याज देत आहेत. व्याज वार्षिक आधारावर दिले जाते, परंतु, त्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. यामुळे ही रक्कम दुप्पट होण्यास मदत होते. पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या कालावधीसह टाईम डिपॉझिट खात्यात गुंतवलेली रक्कम आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० C अंतर्गत लाभासाठी पात्र आहे.

या योजनेत कोणतीही एक व्यक्ती आपले खाते उघडू शकते. याशिवाय ३ प्रौढ व्यक्ती मिळून संयुक्त खाते (टाईम डिपॉझिट जॉइंट अकाउंट) देखील उघडू शकतात. त्याचसोबत पालक आपल्या १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावावर खाते उघडू या योजनेचा लाभ मिळवू शकतात.

उदाहरण द्यायचे झाल्यास, या योजनेत जर एखाद्याने १ लाख रुपयांच्या ठेवीसह ५ वर्षांच्या मुदतीची मुदत ठेवली. तर ५ वर्षानंतर ६.७ टक्के वार्षिक व्याजदराने ती व्यक्ती १ लाख ३९ हजार ४०७ रुपये मिळतील. यामुळे पोस्टातील ( indian Post Office ) योजना खूपच फायद्याची मानली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *