सोने-चांदीमध्ये तेजी; जाणून घ्या नवा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । भांडवली बाजारात अस्थिरता वाढल्याने आज कमाॅडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे. आज सोने दरात ३०० रुपयांची वाढ झाली तर चांदी ३५० रुपयांनी महागली.

सध्या एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१६३० रुपये असून त्यात २५१ रुपयांची वाढ झाली आहे. आजच्या सत्रात सोन्याचा भाव ५१३७९ रुपयांपर्यंत गेला होता. आज एक किलो चांदीचा भाव ६८०५० रुपये इतका असून त्यात ३५८ रुपयांची वाढ झाली. चांदीने इंट्राडेमध्ये ६८२७५ रुपयांपर्यंत मजल मारली होती. सराफा बाजारात मागील दोन आठवड्यात सोन्याचा भाव २१५० रुपयांनी कमी झाला तर याच काळात चांदी ३२०० रुपयांनी स्वस्त झाली.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३५० रुपये इतका आहे. त्यात ३५० रुपयांची वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ५१६७० रुपये इतका आहे. त्यात ४३० रुपयांची घसरण झाली आहे.

आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३५० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५१६७० रुपये इतका आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७८१० रुपये इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२१६० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१६७० रुपये इतका आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाची धग अद्याप कायम आहे. त्यातच चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं आहे. ज्यामुळे सोने तेजीत असल्याचे कमाॅडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. जागतिक कमाॅडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव १९१८.२९ डॉलर इतका आहे. त्यात ०.२ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २४.७३ डॉलर प्रती औंस इतका आहे. त्यात ०.६ टक्के घसरण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *