ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत राहावे ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी संघटना (पिंपरी चिंचवड )

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२१ मे । २१ मे रोजी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे मागास प्रवर्गास (ओबीसी) आरक्षणासाठी नेमलेल्या समर्पित आयोगाचे सदस्य डॉ. निलेश गिते (IAS) व त्यांचे सहकारी सदस्य यांची भेट घेऊन ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी  ओबीसी संघटना पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजय लोखंडे , उपाध्यक्ष पांडुरंग महाजन , महिला अध्यक्ष सारिका ताई पवार , वंदना जाधव , ऍड विद्या शिंदे व कविताताई खराडे आदी उपस्थित होते . यावेळी समर्पित आयोगाच्या सदस्यांसोबत ओबीसींच्या आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *