एकनाथ शिंदेंनी दोन वाक्यांत पुढचं राजकारण सांगितलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून ।आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार आहोत, अशा शब्दांत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुढील राजकारणाचे संकेत दिले आहेत. आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही. शिवसैनिकांनी कोणतंही बंड केलेलं नाही. आम्ही पक्षाच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत.

सूरतहून गुवाहाटीकडे रवाना होत असताना शिंदे काही मिनिटंच माध्यमांशी बोलले. मात्र त्यातून त्यांनी त्यांचं भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले. आम्ही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार नाही, या शिंदेंच्या वाक्यांमधून त्यांचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार हे स्पष्ट होत आहे.

आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. आणखी १० आमदार येणार आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली. ५५ आमदारसंख्या असलेल्या शिवसेनेतील ४० आमदार शिंदे यांच्यासोबत खरोखरच असतील, तर शिवसेनेपुढे अभूतपूर्व असा राजकीय व तांत्रिक पेच निर्माण होईल, हे स्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *