महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । राज्य सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालं असून ,राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रात्री उशिरा भेट घेत महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिंद्ध करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावे, असे पत्र दिल्याचे माहिती आहे.
भाजपने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट करण्यास सांगण्याची विनंती केली. मंगळवारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली आणि उद्धव ठाकरे सरकारने बहुमत गमावले आहे आणि त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची गरज असल्याचा दावा करत फ्लोअर टेस्ट घेण्याची मागितली.
आम्ही राज्यपालांना भेटलो आणि त्यांना राज्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल एक पत्र दिले आहे, शिवसेनेचे 39 आमदार बाहेर पडले आहेत आणि त्यांनी सांगितले आहे की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहायचे नाही आणि त्यांनी ही भूमिका घेतली आहे. परिस्थिती पाहता मुख्यमंत्री आणि सरकारकडे बहुमत नाही त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असे फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सांगितले. आता राज्यपाल यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्र दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.