![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजप आमदार (BJP MLA) प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या निवास्थानाच्या बाहेर चोरीच्या सामानाची बॅग सापडली आहे. रविवारी पहाटे हा प्रकार घडला असून या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवांच्या मूर्ती हा ऐवज होता. रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने घराच्या बाहेर बॅग ठेवली होती. मात्र, ही व्यक्ती कोण आहे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही.
या घटनेबाबत लाड यांनी सांगितले की, ‘पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षकांचा फोन आला एक बॅग पडली आहे. मी पाहिलं त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅगा होत्या. पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिस पथक आले. सोनं, चांदी, पैसे, मूर्ती हा ऐवज होता. माझ्या घराबाहेर 24 तास पोलिस संरक्षण असतं. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसला होता. त्यांनी त्याला हटकलं असता त्यानं ती बॅग टाकून पळ काढला.
#WATCH | Mumbai: A bag full of cash, coins, Ganpati idol, etc found outside BJP MLC Prasad Lad's residence. Investigation on
Says, "Police saw a suspicious man passing by my house at 5.30-6 am. When they approached him, he fled&left the bag.Tomorrow it could be something lethal" pic.twitter.com/bvhRkebBJj
— ANI (@ANI) July 10, 2022
या प्रकराची घटना माझ्या घराबाहेर दुसऱ्यांदा घडली आहे. संरक्षण असताना या प्रकराची घटना घडणे योग्य नाही. बॅगेत ऐवज सापडला. त्यामध्ये दुसरं काही असतं तर घातपात होण्याची शक्यता होती. त्यामुळे रात्रीचं गस्तीपथ वाढवावं, अशी विनंती मी पोलिसांना केली आहे.’