Sheetal Mhatre : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांना मोठी जबाबदारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये दहीसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांना लॉटरी लागली आहे. शीतल म्हात्रे यांची थेट प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (maharashtra political crisis former coroporator sheetal mhatre her appointed eknath shinde group spockperson)

म्हात्रे यांच्याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी किरण पावसकर आणि संजय मोरे यांची शिवसेना सचिव पदी नियुक्ती केलीय. दीपक केसरकर मुख्य प्रवक्ते तर गुलाबराव पाटील, उदय सामंत, किरण पावसकर, आणि शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलीय. तर डॉ. बालाजी किणीकर आता खजिनदारपदी जबाबदारी सांभाळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *