कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करू नका, गडकरींचा महाराष्ट्रातील नेत्यांना सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – नवी दिल्ली : भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि कामाच्या पद्धतीमुळे देशभर चर्चिले जातात. अनेकदा आपल्याच पक्षातील चुकांवरही त्यांनी बोट ठेवल्याचं महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं आहे. त्यामुळेच, सर्वच राजकीय पक्षात त्यांच्या मताला मोठी किंमत आहे. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने नितीन गडकरी हेही घरातून आपलं कामकाज पाहात आहेत. तसेच, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलं शक्य ते योगदान देत आहेत. त्यातच, बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी राज्यातील काही नेत्यांचे कानही टोचले.

कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला गडकरी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये. मलादेखील अनेकदा महाराष्ट्र सरकारच्या काही बाबी पटत नाहीत. तेव्हा मी थेट मुख्यमंत्री किंवा सचिवांशी चर्चा करतो. चुका सगळ्यांकडून होतात, अशावेळी चर्चा करुन मार्ग काढायचा असतो. एकमेकांवर जाहीर टीका करून वाद निर्माण करणे टाळायला पाहिजे’, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांचे कान टोचले आहेत. कोरोनाचे संकट टळल्यानंतर राजकारण करा, ही राजकारण करण्याची वेळ नाही, असेही गडकरी यांनी म्हटले. दरम्यान, यापूर्वी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात कुणीही राजकारण करु, मला यात राजकारण करायचं नाही, असे म्हणत कोरोनाचे संकट एकजुटीने लढण्याचा सल्ला दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *