राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत चांगली बातमी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहे. राजूचे व्यवसाय व्यवस्थापक नयन सोनी यांनी त्याच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. राजू उपचाराला प्रतिसाद देत आहे. त्याच्या शरीराचे अवयव हलत आहेत. राजू श्रीवास्तवला १० ऑगस्ट रोजी जिम करीत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.

राजू लवकर बरा व्हावा यासाठी लाखो चाहते प्रार्थना करीत आहेत. राजू श्रीवास्तवचे व्यवसाय व्यवस्थापक नयन सोनी यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आता त्याच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली आहे. औषधांचा परिणाम शरीरावर होत होता. सध्या त्याला काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनाही भेटू दिले जात नाही आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राजूला शुद्धीवर येण्यासाठी एक आठवडा लागू शकतो. राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनी आधीच निवेदन जारी केले होते की, राजूची (Raju Srivastav) प्रकृती हळूहळू बरी होत आहे. त्याच्या चाहत्यांना आमचे एकच आवाहन आहे की, त्यांनी अफवांकडे लक्ष देऊ नये. राजू लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *