Shivneri Bus Travelling : शिवनेरी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ नोव्हेंबर । मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील नागरिकांना आता शिवनेरी आणि अश्वमेध या बसगाड्यांमधूनही मोफत प्रवास करणं शक्य होणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमार्फत या सेवेचा लाभ ज्येष्ठांना घेता येणार आहे. आत्तापर्यंत केवळ शिवशाही बसमधून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत होता. मात्र वाहतूक विभागाने शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांसाठीदेखील अमृत योजना लागू करण्याचा प्रस्ताव पाठवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *