( औरंगाबाद ) संभाजीनगर मध्ये रुग्णसंख्या ५४६ वर ; शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – रविवारी सकाळी 38 रुग्णांची भर पडल्याने 508 वरून एकूण बधितांची संख्या 546 झाली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली. मागील तीन दिवसात शहरात शुक्रवारी 100, शनिवारी 30 आणि रविवारी 38 अशा 168 रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रविवारी सकाळी शहरातील दत्त नगर 1, चंपा चौक 5, राम नगर 15 या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली. तसेच रामनगर4, रोहिदास नगर 2 संजय नगर 1, सिल्कमिल कॉलनी 8, वसुंधरा कॉलनी एन 7 सिडको, एमआयटी कॉलेज बीड बायपास येथील प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह असल्याचे घाटी रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले. यामुळे रुग्णसंख्या 38 ने वाढली असून शहरातील एकूण रुग्णसंख्य 546 वर गेली आहे.

दरम्यान, शहरात शुक्रवारी दिवसभरात १०० रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी १७, दुपारच्या सत्रात १३ अशा दिवसभरात ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडून बाधित रुग्णांची संख्या ५०८ वर गेली.

शनिवारी सकाळी संयजनगर- मुकुंदवाडी ६, असिफिया कॉलनी १, कटकटगेट २, या जुन्या भागांसह बाबर कॉलनी ४, भवानीनगर जुना मोंढा २, सिल्कमील काॅलनी व रामनगर येथील प्रत्येकी एक अशी १७ रुग्ण आढळून आली. यात १७ रुग्णांत १० महिलांसह ७ पुरुषांचा समावेश आहे. दुपारी आढळलेल्या तिघांत सातारा परिसरातील ५० वर्षीय पुरुष, पंचकुवा किलेअर्क येथील ३५ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ७५ वर्षीय वृद्ध यांचा समावेश आहे. तर त्यानंतर आढळून आलेल्या दहा रुग्णांमध्ये गंगापूरमधील १ आणि पुंडलिक नगर येथील ९ जणांचा समावेश आहे. यामुळे शनिवारी दिवसभरात एकूण ३० रुग्णांची भर पडून एकूण रुग्ण संख्या ५०८ वर गेली. वाढलेली रुग्णसंख्या आणि नवीन भागात रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *