वयाच्या ४९व्या हा अभिनेता करणार दुसरं लग्न? अभिनेत्याच्या कुटुंबियांनी दिला मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० जानेवारी । बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. लवकरच हृतिक दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. तर त्याचबरोबर यावर्षी तो त्याची गर्लफ्रेंड सबा आझादशी लग्न करण्याच्या तयारीत आहे असंही समोर आलं आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकत्र दिसले. कधी पार्टीमध्ये तर कधी दोघेही सुट्टीचा आनंद लुटताना दिसतात. हृतिकच्या चाहत्यांनाही दोघांची जोडी आवडते आणि अशा परिस्थितीत आता हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. हृतिक रोशनचे कुटुंबही सबा आणि त्याच्या नात्याबद्दल खूप खुश आहे. इतकंच नाही तर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्यांची दोन्ही मुलं यांचेही सबाशी चांगले संबंध आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक आणि सबा हे दोघेही त्यांच्या लग्नाचं प्लॅनिंग करत आहेत. पण त्यात त्यांना कोणतीही घाई करायची नाही. सध्या दोघेही त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि त्यांना आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस ती दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. तसंच लग्नानंतर सुट्टीवर जाणार आहे. हे लग्न अजिबात भव्य होणार नाही आणि सुझान खानसह फक्त हृतिकचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत, असं हृतिकच्या एका जवळच्या व्यक्तीने मीडियाला सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *