प्रकाश आंबेडकर, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं ? या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ जानेवारी । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं होतं. शेवटी आज पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपसोबत आम्ही सध्या युती करणार नाही. तसंच भाजपसोबत असलेल्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांना शिंदे साहेबांसोबत युती करण्याची इच्छा आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांचा स्वाभाव माहित आहे. त्यांनी लवकरात लवकर युती करत असल्याचं जाहीर करावं. निवडणुका तोंडावर आल्या आहेत असं आमदार शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी संजय शिससाट यांनी यावेळी संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. संजय राऊत मागे एकदा बोलताना म्हणाले होते की, मुख्यमंत्री आता डाओसला बर्फात खेळायला जाणार आहेत. मात्र आता हा दौरा रद्द झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून दौरा रद्द केल्याचं ते म्हणत असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *