![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ जानेवारी । सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर एका वर्षातील नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. डिसेंबर हा सलग दुसरा महिना आहे. जेथे किरकोळ महागाई RBI च्या 4 (+/- 2) टक्क्यांच्या टॉलरेंस बँडच्या जवळ आला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 6.77 टक्के होता तर, नोव्हेंबरमध्ये हा दर 5.88 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता.
डिसेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्याच्या महागाईत घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.05 टक्के नोंदवण्यात आला आहे. हा दर नोव्हेंबरमध्ये 5.22 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता.
तर शहरी भागात डिसेंबर महिन्यात अन्नधान्यचा महागाई दर 2.80 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे, जो नोव्हेंबरमध्ये 3.69 टक्क्यांवर होता. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर 15.08 टक्क्यांवर नोंदवण्यात आला असून, फळांच्या भाववाढीचा दर दोन टक्के राहिला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर 8.51 टक्के, अंड्यांचा महागाई दर 6.91 टक्के आणि मसाल्यांच्या महागाईचा दर 20.35 टक्के नोंदवण्यात आला आहे.