Ajwain Leaves Benefits : हिवाळ्यातील अनेक आजारांवर बहुगुणी ठरतील हि पाने

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ जानेवारी । ओव्याचा उपयोग भारताच्या प्रत्यक घरात केला जातो पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल की ओव्याच्या पानचा सुद्धा वापर केला जातो. ओव्याचा उपयोग आपण वेगवेळ्या पदार्थत टाकण्यासाठी करतो त्यामुळे जेवणाला एक वेगळी चव येते किंवा जेवणानंतर बडीशोपसोबत ओवा खायला देतात.

त्याच ओव्याच्या पानात औषधी गुण आहेत आयुर्वेदात याला महत्वाचे स्थान देण्यात आले आहेत.चला तर जाणून घेऊ या पानांचा नक्की वापर कसा केला पाहिजे हे जाणून घेऊया

1. फ्रेश ग्रीन ज्यूस

या ओव्याच्या पानाचा उपयोग तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्यूस सोबत करू शकता.तुमच्या आवडीचा कोणताही ज्यूस घ्या त्यात या २/३ओव्याची पाने टाकून तुम्ही ती ड्रिंक घेऊ शकता त्यामुळे तुमच्या पचनाच्या समस्या सुटण्यास मदत होईल.कारल्याचा रस,पालकचा रस, गाजरचा ज्यूस किंवा मोसंबी ज्यूस यामध्ये ओव्याची ४/५ पाने बारीक करून टाकू शकता.तुमच्या आरोग्य (Health) नेहमी निरोगी राहील.

2. भजी बनवण्यासाठी वापर

आळूच्या पानाची जशी भजी बनवली जातात तशीच भजी आपण या ओव्याच्या पानापासून बनवू शकतो किंवा मसालेदार (Spices) बेसन मध्ये ओव्याच्या पाने टाकून त्यांना तेलात डीप फ्राय करून गरमा गरम खाऊ शकता.

3. चटणी बनवण्यासाठी वापर

लसूण,हिरवी मिरची,अदरक आणि मीठ टाकून सोबत ओव्याच्या पानाची पेस्ट करून घ्या आणि दोन्ही एकत्र मिक्स करून त्याची चटणी करा.ही चटणी तुम्ही समोसा, कचोरी,भजी कशासोबतही सहज खाता येते. याना दही सोबत सुद्धा खाऊ शकतो.

4. सर्दी,खोकलासाठी उपयुक्त

सर्दी (Cold) खोकला होत असले तर ओव्याचा पानाचा काढा दिवसातून २ वेळा पिला पाहिजे.ओव्याचा १५/३० पान स्वच्छ पाण्याने (Water) साफ करून त्याला गरम पाण्यात उळवून घ्या.कमी आचेवर टाकलेल्या पाण्याचे ३%पाणी शिल्लक राहील तोपर्यंत उकळून घ्या. हा काढा २/३ दिवस घेतल्यावर तुमची सर्दी आणि खोकला हळुहळू कमी होईल.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *