‘फिलिप्स’कडून जगभरातील 6 हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । ग्लोबल टेक कंपनी फिलिप्सने एक निवेदन जारी करत लवकरच 6 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा केली आहे. स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या ताज्या नुकासानीनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी 2025 पर्यंत कर्मचारी संख्येत आणखी कपात करण्याची घोषणा केली आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.

तीन महिन्यांपूर्वीही कंपनीने 4 हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली होती. यादरम्यान फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी एका निवेदनात सांगितले की, उत्पादकता वाढवण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून आम्ही जागतिक स्तरावर सुमारे 4 हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजकाल जागतिक संकटाची शक्यता लक्षात घेता, अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली आहे. जगभरात होणाऱ्या मंदीच्या भीतीने मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि अॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. याशिवाय अनेक स्टार्टअप्स कंपन्यांनी देखील खर्च कपात आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *