महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । सामन्यांच्या खिशावर दिवसेंदिवस भार पडताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल, सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता पुणेकरांच्या खिशावर आणखी भार पडणार असल्याचे दिसून येत आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) दूधाच्या खरेदी आणि विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून गायीच्या दूधाच्या खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
कात्रजच्या दुधातच्या दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून कात्रजच्या दुध दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे..
म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ न करता विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहेत. एकीकडे शेतकर्यांना वाजवी दर देताना ग्राहकांवर दूध दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे. दरम्यान, कात्रज दूध संघाचे रोजचे दूध संकलन मागील पंधरा दिवसांपूर्वी सुमारे २ लाख १५ हजार लिटरइतके होत होते. ते घटून सध्या १ लाख ९२ हजार लिटरपर्यंत खाली आले आहे.
दूध खरेदीसाठी स्पर्धा वाढू लागल्यामुळे अधिक दर देणार्या डेअर्यांकडे संकलन वाढल्याने संघाचे दूध संकलन घटू लागले आहे. त्यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय कात्रज संचालक मंडळाने घेतला आहे. उद्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे.
१ फेब्रुवारीपासून गायीच्या दूधाचा ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी खरेदी दर संस्थांसाठी वरकड खर्चासहित प्रतिलिटर ३७ रुपये ८० पैसे राहील. दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्याने दूधाच्या विक्री दरात देखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कात्रज डेअरीच्या दुधाचे दर हे टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित व मलई दूधाचे दरात प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात आली .