Gold-Silver Price on 6 February 2023: आज सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक ; पहा आजचे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ फेब्रुवारी ।Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५२,४०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,२०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,४०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,१६० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,१६० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,४०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,१६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,४३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,१९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७१२ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *