महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २० फेब्रुवारी । (Maharashtra Summer) महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात असणारी थंडीची लाट आता परतताना दिसत असून, अनेक भागांमधील तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. फेब्रुवारी (February) महिन्यातच उन्हाच्या झळांमुळं सर्वसामान्य नागरिक त्रस्त होताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिना संपलाही नसताना तापमानाच झालेली वाढ पाहता आणखी चार महिनेहा उन्हाळा किती तीव्र होणार? या प्रश्नानंच अनेकांना धडकी भरत आहे.
महाराष्ट्रासह गुजरात (Gujrat) आणि गोव्यामध्ये (Goa) पुढील काही दिवसांत कापमान तब्बल 37 ते 39 अंशांमध्ये असेल अशा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत्या तापमानामुळं नागरिकांना त्रास होऊ शकतो. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान उन्हाडा कडाका जास्त असल्यामुळं यादरम्यान गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असाही इशारा अभ्यासकांनी दिला आहे.