65 व्या वर्धापन दिनानिमित्त पंजाबराव डक यांचे मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ फेब्रुवारी । अजय विघे | कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अग्रगण्य असलेल्या सुरेगाव ग्रामपंचायत ला दि.24 फेब्रुवारी रोजी 65 वर्षे पूर्ण होत या ग्रामपंचायतच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सुरेगाव ग्रामपंचायत चे सरपंच शशिकांत वाबळे यांनी दिली आहे.उद्या 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी बांधवांसाठी प्रसिध्द असलेले अचूक हवामान सांगणारे तज्ज्ञ पंजाबराव डख हिरव्यागार शेतीचा व काळ्या मातीचा बाप माणूस यांचे हवामान व पर्जन्यमान या विषयावर शेतकऱ्यांसाठी सकाळी 10 वाजता जाहीर मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष दादा हे राहणार आहेत. यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचे हवामान व पर्जन्यमान व पिकाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असून याचा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच या याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरेगाव ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *