Gold-Silver Price on 23 February 2023: उच्चांकी पातळीपेक्षा सोने स्वस्त, तर चांदीचे दर स्थिर ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ फेब्रुवारी । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५१,८०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६८,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६८,८०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,८०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५१० रुपये असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,८३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५४० रुपये आहे. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,८०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,५१० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,८०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५१० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६८८ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *