डायबिटीज, ब्लड प्रेशरच्या औषधांच्या दरांची केली निश्चिती ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०१ मार्च । केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) या विभागाने मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर घेतल्या जाणाऱ्या ७४ औषधांचे दर निश्चित केले आहेत. या संबंधित प्राधिकरण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांच्या आधारे ऑर्डर २०१३ अंतर्गत किरकोळ औषधांच्या किंमती निश्चित केल्या गेल्या.

National Pharmaceutical Pricing Authority म्हणजेच NPPA या विभागाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहावे यासाठी घेतल्या जाणाऱ्या Dapagliflozin, Sitagliptin आणि मधुमेहावरील Metformin Hydrochloride यांच्या एका टॅब्लेटची किंमत २७.७५ रुपये असेल अशी घोषणा करण्यात आली. तसेच उच्च रक्तदाबावर उपयुक्त असलेल्या Telmisartan, Bisoprolol Fumarate या औषधांची किंमतही कमी करण्यात आली आहे. या औषधांच्या एका टॅब्लेटसाठी ग्राहकांकडून १०.९२ रुपये आकारले जाणार आहे. प्राधिकरण विभागाने ८० अधिसूचित केलेल्या औषधांच्या दरांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. न्युट्रोपेनिया आणि एपिलेप्सी अशा आजारांवर उपचार म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

NPPA द्वारे Filgrastim injection (one vial) १,०३४.५२ रुपयांना असेल असे ठरवण्यात आले आहे. तसेच Sodium Valproate (20mg) या औषधाची किंमत देखील कमी करण्यात आली आहे. सध्या त्याची एक टॅब्लेट ३.२० रुपयांना मिळणार आहे. Hydrocortisone च्या दरामध्येही घट झाली आहे. याच्या एका टॅब्लेटची किंमत १३.२८ रुपये असणार आहे.

सरकारच्या या विभागाद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणाऱ्या औषधांचे दर निश्चित करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे तसेच देशभरात योग्य दरात औषधे उपलब्ध करुन देणे अशी कामे केली जातात. केलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे, औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे यांसारख्या कामांमध्येही हा विभाग सक्रिय असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *