शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मार्च । शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह मार्फ केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना केल्याची घोषणा सोमवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सोशल मीडियाचा राज्य समन्वयक विनायक डावरे याने हा व्हिडिओ मातोश्री या फेसबुक पेजवर अपलोड केला असून, इतर आरोपींनी जाणीवपूर्व काही व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल करून फेसबुक पेजवर शेअर केल्याचे समोर आल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भर पडली आहे.

विधानसभेत केले निवेदन

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार भारती लव्हेकर, यामिनी जाधव, मनीषा चौधरी यांनी याबद्दल प्रश्न विचारले. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही जोरदार हरकत घेतली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजचे कामकाज संपण्यापूर्वी सरकारने निवदेन सादर करावे, असे आदेश दिले. त्यानुसार मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदन साजर करून या प्रकरणाचा घटनाक्रम विधानसभेत मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *