Constipation : सकाळी पोट साफ होत नाही ? हे उपाय करा भरपूर फरक जाणवेल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मार्च । अनेकांचं सकाळी सकाळी पोट साफ होत नाही मग ना कामात मन लागत ना कशात. सकाळी पोट साफ होणे, ही एक हेल्दी गोष्ट आहे. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास हा आपल्याला आपल्या चुकीच्या खानपानामुळे होतो. चुकीची लाईफस्टाईल, अनहेल्दी फुडचे सेवन, चुकीच्या वेळी जेवण यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

आज आपण काही खास उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे सहज सकाळी पोट साफ होणार. (how to resolve Constipation read home remedies)

बद्धकोष्ठता म्हणजे काय?

बद्धकोष्ठता म्हणजे जेव्हा तुम्हाला मळ त्याग करणे कठीण जातं. यामुळे तणाव वाढतो आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ शौचालयात जातो. फायबरयुक्त पदार्थ कमी खाणे, ताण-तणाव, हार्मोनल बदल, पाठीच्या कणामध्ये दुखापत, स्नायुंची समस्या, अपचन इत्यादी समस्येंमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास हा वाढतो.

पोट साफ न होण्यामागील कारणे

फाइबरचे सेवन कमी असणे

पाणी कमी पिणे

चुकीची लाईफस्टाईल असणे

रुटीनमध्ये बदल करणे

खूप जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे

आयरन कॅल्शियम आयरन, कॅल्शियम, एंटासिड्स और ड्यूरेटिक सप्लीमेंट्स कमी असल्याच्या कारणाने

स्टूल्सला खूप वेळ थांबविल्यामुळे

पोट साफ होण्यासाठी काही खास उपाय

पाणी भरपूर पिणे

प्रोसेस्ड फूड्सचे सेवन कमी करणे

नियमित एक्सरसाइज करणे

गहू, फळ भाज्यांचे सेवन करणे

टोमॅटो आणि धनियाचा ज्युस प्यावे.

फळ आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *