‘हे’ सगळं फडणवीसांनीच घडवून आणलं, तानाजी सावंतांचा मोठा गौप्यस्फोट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मार्च । 2019 सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केला आहे. नरेंद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडनुका लढलो जनतेने कल ही आमच्या बाजुने दिला माञ उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्या असल्याचा डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितल आहे. सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राज्यातील सत्ता बदलात माझा काही हात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी या आधी सांगितल होत. पण सावंत यांनी सत्ताबदलात फडणवीस यांचा हात असल्याचा सांगितल्याने यापूर्वी फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संशय निर्माण झाला आहे.

दरम्यान मला मंत्री पदावरून डावल्यावर धाराशिव जिल्हापरिषदमध्ये मी बिजीपी बरोबर सत्ता स्थापन करून बंड सुरू केले. मातोश्रीवर जाऊन हे सरकार बदल केल्याशिवाय शांत राहणार नाही. परत मातोश्रीचे तोंड ही बघणार नसल्याचे हे मातोश्रीवर जाऊन सांगून आल्याचे वकत्व तानाजी सावंत यांनी केले आहे. सावंत हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असताना एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांची स्तुती केली आहे. 2019 साली नरेंद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेतृत्वात भाजप सेनेला लोकांनी बहुमत दिले असतानाही आमच्या युतीत मिठाचा खडा महाराष्ट्राचे जानते राजे या नावाने भारतभर ओळखले जाणाऱ्यांनी टाकला असल्याचे सांगत तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टिकास्ञ सोडले.

तर उध्दव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळले आहेत. उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या 25 टीएमसी पाणायासंदर्भात माझ्या सांगण्यावरून बैठक लावत पाणी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. आता तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने शिवसेना, भाजप जवळीकता वाढणार का याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. आरोग्यमंञी सावंत धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *