महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ एप्रिल । हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. वर्षातील सगळ्यात शुभ दिवस ज्यादिवशी कुठलंही काम केलं तर त्यात यश नक्की मिळतं. अक्षय म्हणजे कधीही कमी न होणे. यादिवशी सोने खरेदीपासून घर आणि गाडी खरेदीचा मुहूर्त असतो. यादिवशी दान धर्मालाही विशेष महत्त्व आहे. अशा या साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya 2023) कधी आहे, जाणून घेऊया .
हिंदू धर्मात हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित करण्यात आला आहे. नवीन कार्याची सर्वात करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 22 एप्रिल 2023 सकाळी 07.49 वाजेपासून सुरु होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 07.47 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी साजरी करण्यात येणार आहे.
अक्षय्य तृतीया 2023 पूजा मुहूर्त (Akshaya Tritiya 2023 Puja Muhurat)
अत्यंत शुभ अशा दिवशी स्नान, दान, जप, हवन, तर्पण इत्यादी गोष्टी केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम आणि हयग्रीवाचा अवतार घेतला होता, असं म्हटलं आहे. यादिवशी अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाची पूजेला महत्त्व आहे. जाणून घ्या पुजेचं शुभ मुहूर्त 23 एप्रिल 2023 ला सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे.
अक्षय्य तृतीया 2023 खरेदीचा मुहूर्त (Akshaya Tritiya 2023 Shopping Muhurat)
अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी सगळ्यात शुभ दिवस. यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदी केली जाते. असं म्हणतात की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी चांदी, मालमत्ता आणि अगदी कुठल्याही शुभ कार्यासाठी सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. तरीही सोने खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
अक्षय्य तृतीया 2023 पंचांग मुहूर्त (Akshaya Tritiya 2023 Panchang Muhurat)
सकाळचा मुहूर्त (शुभ) – 07:49 AM – 09:04 AM (22 एप्रिल 2023)
दुपारचा मुहूर्त (चार, लाभ, अमृत) – 12:20 PM – 05:13 PM (22 एप्रिल 2023)
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ) – 06:51 PM – 08:13PM (22 एप्रिल 2023)
रात्रीची वेळ (शुभ, अमृत, चार) – 09:35 PM – 01:42 AM, 23 एप्रिल
उषाकाल मुहूर्त (लाभ) – 04:26 AM – 05:48 AM (23 एप्रिल 2023)
अक्षय्य तृतीया पूजन पद्धत (Akshaya Tritiya Puja Vidhi)
या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन पिवळे कपडे घाला. त्यानंतर मंदिरातील विष्णूजींना गंगाजलाने स्नान करुन पवित्र करा. तुळशीची पूजा करा आणि पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. उदबत्ती आणि दिवा लावून पूजा करा. विष्णूजींच्या ग्रंथाचं पठण करा आणि विष्णूजींची आरती करा. त्याशिवाय गरिबांना अन्नदान करा.
अक्षय्य तृतीयाला ‘हे’ सुद्धा करा!
या दिवशी गंगा स्नानलाही विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात गंगा स्नान केल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी जव, गहू, हरभरा, सत्तू, दही-तांदूळ, दुधापासून बनविलेले पदार्थ हे ब्राह्मणाला दान करावे. या दिवशी पितृ श्राद्धालाही महत्त्व आहे. हिंदू धर्मात कोणत्याही तीर्थक्षेत्री आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं.